the romans roadमोक्षासाठी रोमनांचा मार्ग म्हणजे काय ?मोक्षासाठी रोमनांचा मार्ग म्हणजे रोमनांच्या पुस्तकातील श्लोक वापरून मोक्षाची चांगली बातमी समजावणे. आम्हांला मोक्ष का पाहिजे, भगवंताने मोक्ष कसा पुरवला, आम्ही मोक्ष कसा प्राप्त करू शकतो, आणि मोक्षाचे परिणाम काय हे सर्व समजाविण्याचा हा एक साधा तरीही शक्तीशाली मार्ग आहे. मोक्षासाठी रोमनांचा मार्गसंबंधीचा पहिला श्लोक आहे रोमन्स ३:२३, ‘’सर्वांनीच पाप केले असून भगवंताच्या कीर्तीस कमी पडलो आहोत.’’ आम्ही सर्वांनीच पाप केले आहे. आम्ही सर्वांनीच अशा गोष्टी केल्या आहेत ज्या भगवंताला प्रिय नाहीत. निरागस असा कोणीच नाही. रोमन्स ३:१०-१८ आमच्या जीवनांमध्ये पाप कसे दिसते याचे विस्तृत चित्र दाखविते. मोक्षासाठी रोमनांचा मार्गसंबंधीचे दूसरे लेखन रोमन्स ६:२३ आम्हांला पापाच्या दुष्परिणामांची शिकवण देते - ‘‘पापाची मजुरी मृत्यु आहे, पण येशू ख्रिस्त आमच्या प्रभूमध्ये शाश्वत जीवन ही भगवंताची देणगी आहे’’ आमच्या पापांसाठी आम्हांला मिळालेली शिक्षा म्हणजे मृत्यू. केवळ शारीरिक मृत्यू नाही तर चिरंतन मृत्यू ! मोक्षासाठी रोमनांचा मार्गसंबंधीचा तिसरा श्लोक तेथून सुरू होतो जेथून रोमन्स ६:२३ थांबविले, ‘‘पण येशू ख्रिस्त आमच्या प्रभूमध्ये चिरंतन जीवन ही भगवंताची देणगी आहे’’ रोमन्स ५:८ जाहीर करते, ‘’पण ह्यामध्ये भगवंत आम्हांवरील आपले स्वतःचे प्रेम दर्शवितोः आम्ही अजूनही जेव्हा पापी होतो, जेव्हा येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण पत्करले.’’ येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण पत्करले. येशूच्या मरणाने आमच्या पापांसाठी मोल चुकते केले. येशूचे पुनरुत्थान सिद्ध करते की भगवंताने आमच्या पापांचे मोल म्हणून येशूचे मरण मान्य केले. मोक्षासाठी रोमनांचा मार्गसंबंधीचा चौथा थांबा आहे रोमन्स १०:९, ‘‘...जर तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करता की ‘येशू प्रभू आहे’ आणि तुमच्या ह्रदयाने विश्वास ठेवता की भगवंताने त्याला मरणातून जिवंत केले तर तुम्ही वाचू शकाल’’ आमच्या जागी येशूच्या मरणामुळे आम्हांला सर्व जे करायचे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवणे, त्याचे मरण म्हणजे आमच्या पापांचे मोल अशी श्रद्धा बाळगणे – आणि आमचे रक्षण होईल ! रोमन्स १०:१३ पुन्हा सांगते, ‘‘ते सर्वजण जे कोणी प्रभूचे नाव घेतील त्यांचे रक्षण होईल.’’ आमच्या पापांचा दंड चुकता करण्यासाठी आणि आम्हांला चिरंतन मरणातून बाहेर काढण्यासाठी येशूने मरण पत्करले. मोक्ष, पापांसाठी क्षमा त्या कोणलाही मिळू शकते जो त्यांचा प्रभू आणि तारणहार म्हणून येशू ख्रिस्तामध्ये श्रद्धा ठेवील. मोक्षासाठी रोमनांचा मार्गसंबंधीची अंतिम बाब म्हणजे मोक्षाचे परिणाम. रोमन्स ५:१ हा सुंदर संदेश देते, ‘‘आणि म्हणून, श्रद्धेमुळे आमच्या दोषांचे निराकरण केले आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमची भगवंताशी शांती आहे.’’ येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही भगवंताशी शांतीचे नाते निर्माण करू शकतो. रोमन्स ८:१ आम्हांला शिकवण देते, ‘‘आणि म्हणून आता त्यांना कोणताही निषेध नाही जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत.’’ आमच्या जागी येशूच्या मरणामुळे आमच्या पापांसाठी आमचा निषेध होणार नाही. शेवटी, रोमन्स ८:३८-३९ मधून हे आमच्यासाठी भगवंताचे बहुमोल असे वचन आहे, ‘‘ह्यासाठी की, माझे समाधान झाले आहे की मरण नाही जीवन नाही, देवदूत नाहीत राक्षस नाहीत, वर्तमान नाही भविष्य नाही, कोणतीही शक्ती नाही, उंची नाही खोली नाही, निर्मितीतील अन्य काहीही नाही जे आम्हांला भगवंताच्या प्रेमापासून दूर करू शकेल, जे येशू ख्रिस्त आमच्या प्रभूमध्ये आहे.’’ मोक्षासाठी रोमनांचा मार्ग अनुसरण्याची तुमची इच्छा आहे काय ? जर होय, तर इथे एक साधी प्रार्थना आहे जी तुम्ही भगवंतासाठी म्हणू शकता. ही प्रार्थना म्हणणे म्हणजे भगवंताला केवळ सांगण्याचा मार्ग आहे की तुम्ही तुमच्या मोक्षासाठी येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवीत आहात. शब्द तुमचे रक्षण करणार नाहीत. केवळ येशू ख्रिस्तामधील श्रद्धाच तुम्हांला मोक्ष मिळवून देऊ शकते. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. तुझ्या मदतीने मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’ |