Get right with Godमी भगवंताशी योग्य कसे राहावे ?भगवंताशी ‘‘योग्य’’ राहाण्यासाठी आम्हांला अगोदर ‘‘अयोग्य’’ काय ते समजून घ्यावे लागेल. उत्तर आहे पाप. चांगले करतो असा कोणीही नाही, एखादासुद्धा नाही (प्साल्म १४:३). आम्ही भगवंताच्या आज्ञेंविरुद्ध बंड केले आहे. आम्ही ‘‘भटकलेल्या शेळीसारखे आहोत’’(इसाइया ५३:६). वाईट बातमी म्हणजे, पापाची शिक्षा मृत्यु आहे. ‘‘जो आत्मा पाप करतो तो मृत्यु पावणार आहे’’ (इझेकियल १८:४). चांगली बातमी अशी आहे की आम्हांला मोक्ष प्राप्त होण्यासाठी प्रेमळ भगवंताने पिच्छा पुरविला आहे. येशूने जाहीर केले की त्याचा उद्देश ‘‘जे हरवले होते ते मिळवणे आणि वाचविणे’’ हा होता (ल्युक १९:१०), आणि ‘‘ते संपले’’ असे म्हणत जेव्हा त्याने क्रूसावर मरण पत्करले तेव्हा त्याने त्याचा उद्देश प्राप्त केल्याचा उच्चार केला (जॉन १९:३०). भगवंताशी योग्य राहाण्याची सुरुवात होते आपल्या पापाची दखल घेण्यापासून. त्यानंतर येते तुमच्या पापाची भगवंतापाशी विनम्रपणे कबुली देणे (इसाइया ५७:१५) आणि पापाचा त्याग करण्याचा निर्धार. ‘‘तुमच्या ह्रदयाने तुम्ही विश्वास ठेवता आणि दोष निरसन करता, आणि तुमच्या मुखाने तुम्ही कबुली देता आणि वाचविले जाता’’ (रोमन्स १०:१०). ह्या पश्चात्तापाच्या बरोबरीने पाहिजे श्रद्धा, अशी श्रद्धा की येशूचे त्यागमय मरण आणि चमत्कारपूर्ण पुनरुत्थानामुळे त्याला तुमचा तारणहार म्हणून पात्र बनविले आहे. ‘‘...जर तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करता की ‘येशू प्रभू आहे’ आणि तुमच्या ह्रदयाने विश्वास ठेवता की भगवंताने त्याला मरणातून जिवंत केले तर तुम्ही वाचू शकाल’’ (रोमन्स १०:९). आणखीही उतारे श्रद्धेची गरज प्रतिपादन करतात. जसे, जॉन २०:२७; एक्ट्स १६:३१; गॅलेशियन्स २:१६; ३:११; २६; आणि एफिशियन्स २:८. भगवंताशी योग्य राहाणे ही भगवंताने तुमच्यातर्फे काय केले त्यास तुमच्या प्रतिसादाची बाब आहे. त्याने तारणहार पाठविला, तुमची पापे नाहिशी करण्यास बलिदान पुरविले (जॉन १:२९), आणि तो तुम्हाला वचन देतोः ‘‘देवाचे नाव घेतील ते सर्वजण वाचतील’’ (एक्ट्स २:२१) पश्चात्ताप आणि क्षमाशीलतेचे एक सुंदर उदाहरण म्हणजे उधळ्या पुत्राची बोधकथा (ल्युक १५:११-३२). लहान पुत्राने त्याच्या वडिलांची देणगी लज्जास्पद पापामध्ये घालविली (श्लोक १३). जेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने घरी परतण्याचे ठरविले (श्लोक १८). त्याला वाटले ह्यापुढे पुत्र म्हणून त्याला स्वीकारण्यात येणार नाही (श्लोक १९), पण तो चुकीचा ठरला. परत आलेल्या बंडखोरावर वडिलांचे पूर्वीसारखेच प्रेम होते (श्लोक २०). सर्व विसरले गेले होते आणि ऊत्सव आला (श्लोक २४). ‘‘भगवंत त्याचे वचन राखण्यासाठी खूप चांगला आहे, क्षमा करण्याचे वचनसुद्धा. ‘‘प्रभू भग्नह्रदयांच्या जवळ आहे आणि आत्मा गळालेल्यांना वाचवितो’’ (प्साल्म ३४:१८). जर तुम्हाला भगवंताशी योग्य राहायचे असेल, तर इथे प्रार्थनेचा नमुना आहे. लक्षात ठेवा, ही किंवा अन्य कोणतीही प्रार्थना म्हटल्याने तुमचे रक्षण होणार नाही. केवळ ख्रिस्तामध्ये श्रद्धा ठेवल्यानेच तुमचे पापांपासून रक्षण होणार आहे. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि तुम्हांला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’ |