Can I know for Sureमेल्यानंतर मी स्वर्गात जाणार हे मी खात्रीपूर्वक कसे जाणू शकतो ?

तुम्हाला चिरंतन जीवन आहे आणि मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार ह्याची तुम्हाला खात्री आहे का ? तुम्ही खात्रीशीर व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे ! बायबल सांगते, ‘‘मी हे तुमच्यासाठी लिहित आहे ज्यांचा भगवंताच्या पुत्रामध्ये विश्वास आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी चिरंतन जीवन आहे’’ ( १ जॉन ५:७). समजा, आत्ता तुम्ही भगवंतासमोर उभे आहात आणि त्याने तुम्हाला विचारले, ‘‘मी तुम्हाला स्वर्गात का घ्यावे ?’’ तुम्ही काय सांगणार, काय उत्तर द्यावे हे कदाचित तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की भगवंत तुमच्यावर प्रेम करतो आणि मृत्युनंतर कुठे व्यतीत करू हे जाणण्याचा एक मार्ग त्याने आम्हांला दिला आहे. बायबल हेच अशाप्रकारे सांगते, ‘’भगवंत जगावर एवढे प्रेम करतो की त्याने त्याचा एकमात्र पुत्र जगाला दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यामध्ये विश्वास ठेवील तो नाश पावणार नसून चिरंतन जीवन प्राप्त करील’’ (जॉन ३:१६).

अगोदर स्वर्गापासून आम्हांला दूर ठेवणारी अडचण आम्ही जाणून घेतली पाहिजे. अडचण अशी आहे – आमचा पापी स्वभाव आम्हांला भगवंताशी नाते असण्यापासून दूर ठेवतो. आम्ही स्वभावाने आणि इच्छेने पापी आहोत. ‘‘सर्वांनीच पाप केले असून भगवंताच्या कीर्तीस कमी पडलो आहोत’’ (रोमन्स ३:२३). आम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. ‘’श्रद्धेमुळे-कृपादृष्टीने तुम्ही वाचला आहात, आणि हे तुम्हांमुळे नाही, ही भगवंताची देणगी आहे-कामामुळे नाही, म्हणून कोणी बढाई मारू नये’’ (एफिसियन्स २:८-९). आम्ही मृत्यू आणि नरकास पात्र आहोत. ‘‘पापाची मजुरी मृत्यु आहे’’ (रोमन्स ६:२३).

भगवंत पवित्र आणि न्यायी आहे आणि त्याने पापासाठी शिक्षा केली पाहिजे, तरी तो आमच्यावर प्रेम करतो आणि आमच्या पापांसाठी आम्हांला क्षमा करतो. येशूने सांगितले आहे : ‘‘मी मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच कोणी पित्याजवळ येऊ शकतो’’ (जॉन १४:६). ‘‘आमच्यासाठी येशूने क्रूसावर मरण पत्करलेः सर्व पापांसाठी एकदाच ख्रिस्ताने मरण पत्करले, दुराचरणासाठी सदाचरण, तुम्हाला भगवंताकडे आणण्यासाठी’’ (१ पीटर ३:१८). येशूचे मरणातून पुनरुत्थान करण्यात आलेः ‘‘आमच्या पापांसाठी त्याला मृत्युकडे ढकलण्यात आले आणि आमच्या दोषनिराकरणासाठी त्याला पुन्हा जीवन देण्यात आले’’ (रोमन्स ४:२५).

तर, पुन्हा मूळ प्रशनाकडे वळूया - ‘’मेल्यानंतर मी स्वर्गात जाणार हे मी खात्रीपूर्वक कसे जाणू शकतो ?’’ उत्तर असे आहे, येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेव आणि तुझे रक्षण होईल (एक्ट्स १६:३१). ‘’अजून त्या सर्वांना, ज्यांनी त्याचा स्वीकार केला, ज्यांनी त्याच्या नावात विश्वास ठेवला, त्याने भगवंताची बालके होण्याचा अधिकार दिला’’ (जॉन १:१२). तुम्ही चिरंतन जीवन एक मोफत भेट म्हणून मिळवू शकता. ‘‘येशू ख्रिस्त आमच्या प्रभूमध्ये चिरंतन जीवन ही भगवंताची देणगी आहे’’ (रोमन्स ६:२३). तुम्ही आत्ताच एक संपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकता. येशूने सांगितले, ‘’मी आलो आहे ते त्यांना जीवन मिळावे आणि ते संपूर्ण मिळावे म्हणून’’ (जॉन १०:१०). तुम्ही येशूबरोबर स्वर्गात चिरंतनत्व व्यतीत करू शकता, कारण त्याने वचन दिलेः ‘‘आणि जर मी गेलो आणि तुमच्यासाठी जागा बनविली, मी परत येणार तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाण्यासाठी, जेणेकरून तुम्ही तेथे राहू शकाल जेथे मी राहीन’’ (जॉन १४:३).

जर तुमचा तारणहार म्हणून तुम्हाला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा असेल आणि भगवंताकडून क्षमा मिळवायची असेल, तर इथे प्रार्थना आहे जी तुम्ही म्हणू शकता. ही किंवा अन्य कोणती प्रार्थना म्हटल्याने तुमचे रक्षण होणार नाही, केवळ ख्रिस्तामध्ये श्रद्धा ठेवल्यानेच तुमचे पापांपासून रक्षण होणार आहे. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि तुम्हाला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे.

‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’


AMAZING GRACE BIBLE INSTITUTE